डोक्यावर कांद्याची टोपली अन् गळ्यात माळ; विधिमंडळाबाहेर महाविकासआघाडीचं आंदोलन

डोक्यावर कांद्याची टोपली अन् गळ्यात माळ; विधिमंडळाबाहेर महाविकासआघाडीचं आंदोलन

| Updated on: Feb 28, 2023 | 10:21 AM

महाविकास आघाडीचे आमदार डोक्यावर कांदाच्या टोपली अन् गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करत आहेत. पाहा व्हीडिओ...

मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातलं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अशात कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. त्याचेच पडसाद विधिमंडळातही पाहायला मिळाले. महाविकास आघाडीचे आमदार डोक्यावर कांदाच्या टोपली अन् गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करत आहेत. महाविकास आघाडी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करत आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.

Published on: Feb 28, 2023 10:13 AM