Special Report |राऊत यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज; आधी अजित पवार नंतर पटोले आणि आता शरद पवार यांनीही झिडकारलं?
शरद पवार पण त्यांच्यावरच दैनिक सामानातून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. त्यांनी नव नेतृत्व निर्माण करण्या पवार अपयशी ठरले असं म्हटलं होतं.
मुंबई : महाविकास आघाडीत सगळ्यात पॉवरफुल नेते म्हणजे शरद पवार पण त्यांच्यावरच दैनिक सामानातून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. त्यांनी नव नेतृत्व निर्माण करण्या पवार अपयशी ठरले असं म्हटलं होतं. त्यांची ही टीका मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुखावणारी होती. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली होती. तर काँग्रेसवर टीका केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राऊत यांनी खडे बोल सुनावले होते. मात्र यावेळी स्वत: शरद पवार यांनी राऊतांचे कान टोचताना त्यांच्यावर पलटवार केला आहे. शरद पवार यांनी राऊत यांनी टोला लगावताना, राष्ट्रवादीतलं राऊत यांना काही माहीत नाही आणि त्यांच्या लिहिण्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत आणि नेत्यात चाललयं तरी काय असा सवाल लोकांच्या मनात आहे. तर थेट शरद पवार यांनी राऊतांना का फटकारलं असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट