शरद पवार यांचा राजीनामा अन् भुजबळ याचं गंमतीशीर वक्तव्य; म्हणाले किमान आमचे चेहरे…
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राऊत आणि भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यात वाद रंगला आहे. यात कधीकधी उद्धव ठाकरे तर कधी त्यांच्या गटाचे नेते ही उतरतात. तर खदी केंद्रीय मंत्री नारायण राणे याचं दर्शन होत असत.
नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार जाणं, ते शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सकाळ संध्याकाळ पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर टीका करत असतात. तर आता बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राऊत आणि भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यात वाद रंगला आहे. यात कधीकधी उद्धव ठाकरे तर कधी त्यांच्या गटाचे नेते ही उतरतात. तर खदी केंद्रीय मंत्री नारायण राणे याचं दर्शन होत असत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि एकच खळबळ उडाली. पत्रकार आणि टीव्ही चॅनेलवाले राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वळाले. त्यावरून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राऊत आणि राणे यांना टोला लगावला आहे. त्यांनी, पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर किमान राष्ट्रवादीच्या नेत्यांचे चेहरे टीव्हिवर दिसले. त्यामुळे लोकांनाही ते बरं वाटलं. कारण तेच तेच भांडणं बघण्यापेक्षा नवीन काहीतरी त्यांना पाहायला मिळालं.. पण हा झाला गंमतीचा भाग. आताही रोज रोज तेच (भांडणं) चालू आहे. नुसती उनी धूनी काढली जात आहेत. लोकांनी हेच बघायचं का? म्हणे उद्धव ठाकरे यांना येऊ देणार नाही…त्यांना पण अभ्यास करू द्या..तुम्ही पण अभ्यास करा.. राज्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्या.. असा टोमना वजा खोचट सल्ला दिला आहे.