भाजपमध्येच भेदभाव! काय कारण? चक्क आमदाराने दिली राजीनाम्याची धमकी; फडणवीस यांनाच अल्टीमेट?
शिवसेना आमदारांनी तत्कालिन मुख्यमंत्री यांच्याकडे निधी वाटपावरून अजित पवार यांच्याबाबत तक्रार करण्यात आली होती. तर भाजपने जोरदार टीका केली होती. हाच कित्ता आता भाजप गिरवत आहे तर त्यांच्याच आमदारांवर निधीवरून अन्याय होत असल्याचे समोर आले आहे.
वर्धा : दोन आडिच वर्षांपुर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी शिवसेना आमदारांनी तत्कालिन मुख्यमंत्री यांच्याकडे निधी वाटपावरून अजित पवार यांच्याबाबत तक्रार करण्यात आली होती. तर भाजपने जोरदार टीका केली होती. हाच कित्ता आता भाजप गिरवत आहे तर त्यांच्याच आमदारांवर निधीवरून अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. इतकेच काय तर वर्ध्याचे आमदार दादाराव केचे यांनी आपल्या मनातील खदखद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राने कळवली आहे. तर पत्रातून जाबच विचारला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी पत्रातून, कारंजासाठी दिलेला निधी आष्टीत व आर्वीत वळता करा. मागणी नसताना हा निधी कसा मंजूर झाला? फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या निधी मंजूर करण्याच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तीन दिवसांत मंजूर केलेला निधी तात्काळ रद्द करावा व तो आर्वीला द्यावा, असा निर्णय न घेतल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.