Supriya Sule on RajyaSabha Election | महाविकस आघाडीने घोडेबाजार रोखण्याचा प्रयत्न केला पण..
महाविकास आघाडीचा मनाचा हा मोठपणा आहे, की ते स्वत: गेले. मात्र घोडेबाजार होऊ नये म्हणून महाविकस आघाडीने घोडेबाजार रोखण्याचा प्रयत्न केला पण...
पुणे : होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणूकीवरून (Rajya Sabha Election) जोरदार राजकारण तचापवलं जात आहे. तर भाजपकडून (BJP) आमचा उमेदवार हा निवडूण येणार असं म्हटलं जात आहे. तर महाविकास आघाडीचे सरकार हे आपले उमेदवार निवडूण आणू यावर ठाम आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणूकीवरून महाराष्ट्रात घोडेबाजार होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supruya Sule) यांनी प्रतिक्रीय देताना‘घोडेबाजार महाराष्ट्राला न शोभणारा’नाही असे म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते स्वतः पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. महाविकास आघाडीचा मनाचा हा मोठपणा आहे, की ते स्वत: गेले. मात्र घोडेबाजार वगैरेसारख्या गोष्टी कानावर येतायेत हे दुर्दैव आहे, असे त्या म्हणाल्या. हे महाराष्ट्राला न शोभणारे नाही. तर महाविकस आघाडीने घोडेबाजार रोखण्याचा प्रयत्न केला पण.. त्याला यश आले नाही असे त्या म्हणाल्या.