राऊत यांच्या ऑफरवर शेलारांची बोचरी टीका, पहा काय म्हणाले…
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत फडणवीस यांना खुली ऑफर दिली. मी तुमच्या घरासमोर येऊन प्रतिक्रिया देतो. त्यानंतर तुम्हीही त्यावर उत्तर द्या. नाही तर तुमची कारस्थाने थांबवा. मी सकाळी सकाळी बोलण्याचे बंद करतो. आहे का डील मंजूर? असे म्हटलं होतं
मुंबई : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घणाघात केला होता. त्यांनी, महाविकास आघाडीची अवस्था सध्या फारच वाईट आहे. पहिला भोंगा सकाळी 9 वाजतो. त्याविरोधात दुसरा भोंगा दुपारी 12 आणि सायंकाळी तिसरा भोंगा पहिल्या दोघांनाही खोडून काढतो, अशी टीका केली होती. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत फडणवीस यांना खुली ऑफर दिली. मी तुमच्या घरासमोर येऊन प्रतिक्रिया देतो. त्यानंतर तुम्हीही त्यावर उत्तर द्या. नाही तर तुमची कारस्थाने थांबवा. मी सकाळी सकाळी बोलण्याचे बंद करतो. आहे का डील मंजूर? असे म्हटलं होतं. त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर बोचरी टीका करताना, त्यांना सिरीयल किलर म्हटलं आहे. रात्री साडेनऊला लोक टीव्ही ऑन करून सिरीयल पाहतात. तर सकाळी साडेनऊला तोच टिव्ही बंद करतात. कारण राऊत हा सिरीयल किलर, वेड्यासारखा बडबडत असतो असे ते म्हणाले.