भाजपने दाखवलेले 5 हजार कोटी पैसे वेगळेच, पण त्यापेक्षा 10 पटीने पैसे त्यांच्याकडे; भाजपवर ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्ला
ठाकरे गटाचे खासदार खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे. त्यांनी भाजप हा भरकटलेला पक्ष असून सत्ता हा धंदा असलेले पक्ष म्हणजे भाजप होय, असे म्हटलं आहे.
नागपूर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा येथील दर्शनकॉलनी मैदानावर 16 एप्रिलला होणार आहे. यासाठी भाजपकडून विरोध करण्यात आला होता. तर उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र न्यायालयाने अटी व शर्तीसह परवानगी दिली आहे. त्याची सध्या जोरदार तयारी सुरू असून उद्धव ठाकरे गटाचे मुख्य नेते नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे. आताही ठाकरे गटाचे खासदार खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे. त्यांनी भाजप हा भरकटलेला पक्ष असून सत्ता हा धंदा असलेले पक्ष म्हणजे भाजप होय, असे म्हटलं आहे. तर अमाप पैसा असलेला भाजप पक्ष असून त्यांनी दाखवलेले 5 हजार कोटी पैसे वेगळेच आहेत. तर त्यांच्याकडे त्यापेक्षा ही 10 पटीने अधिक पैसे असल्याचा दावा केला आहे. भाजपला एकच कळतं फक्त सत्ता आणि सत्तेसाठी पैसा असेही ते म्हणालेत. तर कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. ज्यांनी देशाला संविधान दिलं. त्यांच्या या संविधानानुसार निवडणुका होतात. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या दीड वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे कितीही दौरे केले तरी फरक पडणार नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे.