वज्रमूठ सभेला काँग्रेस नेत्याची गैर हजेरी, काय आहे भंडाऱ्याला जाण्याचे कारण? कोण आहे नेता?
मुख्य समन्वयक माजी मंत्री सुनील केदार यांच्या पक्षांतर्गत विरोध असल्यानेच माजी मंत्र्याने या सभेकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपली वेगळी वाट धरली आहे. त्यांना सभेच्या आयोजनात विश्वासात न घेतल्याने नाराज ते नाराज असल्याचे बोलले जात आहेत
नागपूर : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा ही नागपूरमध्ये होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी झाली असून मविआचे नेते नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मात्र काँग्रेसचे (Congress) नेते दिसत नसल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तर मुख्य समन्वयक माजी मंत्री सुनील केदार यांच्या पक्षांतर्गत विरोध असल्यानेच माजी मंत्र्याने या सभेकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आपली वेगळी वाट धरली आहे. त्यांना सभेच्या आयोजनात विश्वासात न घेतल्याने नाराज ते नाराज असल्याचे बोलले जात आहेत. तर भंडारा पवनी येथे नियोजीत कार्यक्रमाला जावं लागल्याने ते वज्रमूठ सभेला अनुपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.
Published on: Apr 16, 2023 11:48 AM
Latest Videos