मविआच्या सभेतूच पोलिसांनाच दम; म्हणाले, आज तुमचा दिवस पण उद्या...

मविआच्या सभेतूच पोलिसांनाच दम; म्हणाले, आज तुमचा दिवस पण उद्या…

| Updated on: Apr 03, 2023 | 8:38 AM

यावेळी बंदोबस्तावर असणारे पोलिस आणि शिवसेना नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या गाड्या सोडण्यावरून वाद झाल्याचे समोर येत आहे. यावरूनच विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भर सभेतच पोलिसांना दम भरल्याचे पहायला मिळाले

छत्रपती संभाजीनगर : येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ जाहीर सभा पार पडली. यावेळी बंदोबस्तावर असणारे पोलिस आणि शिवसेना नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या गाड्या सोडण्यावरून वाद झाल्याचे समोर येत आहे. यावरूनच विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भर सभेतच पोलिसांना दम भरल्याचे पहायला मिळाले. दानवे यांनी आपण पोलिसांना नम्र विनंती करत आहोत. त्या गाड्या सोड्या असे म्हटलं आहे. तसेच पोलिसांनो या सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून मस्ती करू नका, आजचा दिवस तुमचा असला तरि उद्यापासून आमचा दिवस असेल असा दम भरला.

Published on: Apr 03, 2023 08:38 AM