'अन्यथा सभेत घुसू'ला या टीकेवर शिवसेना नेत्याचा पलटवार, म्हणाल्या...नक्कीच यावं

‘अन्यथा सभेत घुसू’ला या टीकेवर शिवसेना नेत्याचा पलटवार, म्हणाल्या…नक्कीच यावं

| Updated on: Apr 21, 2023 | 8:54 AM

मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील राऊत यांच्यावर टीका केली होती. तसेच पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेत चौकटीत राहून बोलावं अन्यथा सभेत घुसू असा इशारा दिला होता

मुंबई : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाल्यानंतर ठाकरे गटावर शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांच्या आणि शिवसेनेवर ठाकरे गटाच्या टीका होतात. नागपूरमधील वज्रमूठ सभा झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील राऊत यांच्यावर टीका केली होती. तसेच पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेत चौकटीत राहून बोलावं अन्यथा सभेत घुसू असा इशारा दिला होता. त्यावरून आता महाविकास आघाडीतील नेत्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते आक्रमक झाले आहेत. गुलाबराव पाटील यांच्या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी, कोणाला त्याची क्षमता तपासायची गरज असेल तर नक्कीच यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू असे म्हटलं आहे. तर शिंदे गटात प्रचंड संख्येने वाचाळविर तयार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येय वाचाळवीर याच्यावर उत्तर देण्याची गरज नाही असा टोला लगावला आहे.

Published on: Apr 21, 2023 08:08 AM