Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस कोणते नवे आरोप करणार,संपूर्ण राज्याचं लक्ष

देवेंद्र फडणवीस कोणते नवे आरोप करणार,संपूर्ण राज्याचं लक्ष

| Updated on: Mar 14, 2022 | 11:40 AM

पोलीस भरती घोटाळा प्रकरणात रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

पोलीस भरती घोटाळा प्रकरणात रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) या कारवाईचा निषेध भाजपकडून करण्यात आला. राज्यभरात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या नोटिशीची होळी करण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरोपी किंवा सहआरोपी करण्याच्या उद्देशानं प्रश्न विचारण्यात आल्याचा दावा करत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्ला चढवलाय. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘व्हिडीओ बॉम्ब’ टाकून खळबळ उडवून दिल्यानंच महाविकास आघाडी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय.

Published on: Mar 14, 2022 11:40 AM