छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने, व्हिडीओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 11, 2024 | 1:27 PM

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या ठिकाणी महायुती आणि ठाकरे गट आमने -सामने आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने. कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी परस्पराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर ठाकरे गटाकडून मनसेला डिवचण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.दुपारी 12 च्या नंतर इथून चंद्रकांत खैरे यांची रॅली निघणार होती. त्याआधीच महायुतीचे कार्यकर् या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सकाळी यांना रॅली काढायला सांगितली होती पण त्यांना सकाळी रॅली न काढता हे मुद्दामून दुपारी आले असा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे.

Published on: May 11, 2024 01:27 PM