Ajit Pawar : ‘जिसे, निभा ना सकू..’, अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
Ajit Pawar Shayari In Assembly Session : अजित पवार यांनी आज विधानसभेच्या कामकाजात भाषण करताना शेरोशायरी आणि चरोळ्या ऐकवल्या. त्यावर सभागृहात अनेकांनी मनमुराद दाद दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे आभार मानले. यावेळी अजित पवारांनी पुन्हा एकदा आपल्या शेरोशायरीने विरोधकांवर निशाणा साधला असल्याचं बघायला मिळालं.
यावेळी अजित पवार म्हणाले की, काही लोक काहीही बोलतात. स्मारक बांधा म्हणतात. नाहीतर 2029 मध्ये तुमची स्मारक बांधण्याची वेळ येईल. अरे कोणती स्मारक बांधा? तुमचा 2024मध्ये पराभव झाला तर आम्ही म्हणालो का आता तुमचे स्मारक बांधा? उगच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला असं हे आहे, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला आहे. दरम्यान, यावेळी अजित पवारांनी काही चारोळी देखील सभागृहात ऐकून दाखवली.
जिसे, निभा ना सकू, ऐसा, वादा नहीं करता
मै, बातें, अपने ताकत से, ज्यादा, नहीं करता
तमन्ना रखता हु, आसमान, छु लेने की,
लेकीन, औरोंको, गिराने का, इरादा नहीं रखता… त्यांच्या या चारोळीवर अनेकांनी मनमुराद दादही दिली.
ऐकल्या, शिव्या दुनियेच्या,
जाहली, जरी बदनामी,
हे काय, कमी मजसाठी
मी तुम्हा, आवडलो आहे! अशीही एक चारोळी यावेळी अजितदादांनी ऐकवली.

स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...

'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी

पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'

औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
