महायुतीचे राज्यभरात मेळावे, पण घटक पक्षांची नाराजी? वाट पाहू नाहीतर गेम करू… कुणाचा इशारा?

| Updated on: Jan 15, 2024 | 12:57 PM

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असं चित्र दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशावेळी भाजपसाठी लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. महायुतीकडून जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र या मेळाव्यातून राजकीय नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे

मुंबई, १५ जानेवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे पार पडले. मात्र या मेळाव्यात काही नेत्यांची अनुपस्थिती, बच्चू कडू, महादेव जानकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असं चित्र दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशावेळी भाजपसाठी लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र या मेळाव्यातून राजकीय नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. कारण प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू म्हणाले, आम्ही वाट पाहू नाहीतर गेम करू…असे म्हणत इशारा दिलाय. तर ते आतापर्यंत एकापण महायुतीच्या एकाही मेळाव्यात सहभाग नाही. तर आणखी एका घटकपक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपला इशारा देताना मविआमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिलेत. बघा नेमकं काय केलं वक्तव्य?

Published on: Jan 15, 2024 12:57 PM
पक्ष, बाप, चोर आणि राजकारणाला आला जोर; संजय राऊत यांचे इंद्रिय निकामी, कुणाची खोचक टीका?
भुजबळांचा पिस्तुल टाकण्याचा धंदा? जरांगे पाटील यांच्या टीकेवर भुजबळ यांनी काय दिलं प्रत्युत्तर?