राज ठाकरे यांची 'ती' भूमिका योग्य, त्यांनी  मविआला समर्थन दिलं तर..., राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला

“राज ठाकरे यांची ‘ती’ भूमिका योग्य, त्यांनी मविआला समर्थन दिलं तर…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला

| Updated on: May 25, 2023 | 10:22 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नोटाबंदी, त्र्यंबकेश्ववर आणि कर्नाटक निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे राज ठाकरे यांचं पुन्हा भाजपबरोबर बिनसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. एकापाठोपाठ येणाऱ्या राज ठाकरे यांच्या प्रतक्रियांवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नोटाबंदी, त्र्यंबकेश्ववर आणि कर्नाटक निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे राज ठाकरे यांचं पुन्हा भाजपबरोबर बिनसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. एकापाठोपाठ येणाऱ्या राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियांवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरे यांनी मविआला समर्थन देण्याचा विचार केला पाहिजे, असा सल्ला दिला आहे. “त्र्यंबकेश्वर वाद, कर्नाटक निवडणूक आणि नोटबंदी यावरील राज ठाकरे यांच्या भूमिकेचं मी अभिनंदन करतो. राज ठाकरे यांनी पुरोगामी विचाराची भूमिका मांडली. राज ठाकरे यांचं लावरे तो व्हिडीओ हे खूप फेमस झालं होतं. आताही त्यांनी तशीच भूमिका घेतली पाहिजे. राज ठाकरे यांनी मविआला समर्थन देण्याचा विचार केला पाहिजे”, असं महेश तपासे म्हणाले.

Published on: May 25, 2023 10:22 AM