वकिल Gunratan Sadavarte यांच्यावर खोटा आरोप-Adv Mahesh Vaswani

वकिल Gunratan Sadavarte यांच्यावर खोटा आरोप-Adv Mahesh Vaswani

| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 8:07 PM

आम्ही सदावर्तेंना कोठडी देण्यास विरोध केला होता. सदावर्ते यांच्याकडून कोणतीही रिकव्हरी करायची नाही. तसेच ते पळूनही जाणार नाही. त्यांचं घर मुंबईत आहे. ते साक्षीदारांवरही दबाव आणणार नाहीत. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये असं आम्ही कोर्टाला सांगितलं.

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी (police custody)  दिली आहे. त्यानंतर सदावर्ते यांचे वकील अ‍ॅड. महेश वासवानी (mahesh vaswani) यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही सदावर्तेंना कोठडी देण्यास विरोध केला होता. सदावर्ते यांच्याकडून कोणतीही रिकव्हरी करायची नाही. तसेच ते पळूनही जाणार नाही. त्यांचं घर मुंबईत आहे. ते साक्षीदारांवरही दबाव आणणार नाहीत. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये असं आम्ही कोर्टाला सांगितलं. मात्र, एफआयआरमध्ये षडयंत्राची कलम टाकण्यात आल्याने ते तपासण्यासाठी सदावर्तेंना पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती वासवानी यांनी दिली. तसेच यात काही निष्पन्न झालं तर एसटी कर्मचाऱ्यांनाही पुन्हा कोठडी दिली जाणार असल्याचं कोर्टाने म्हटल्याचं वासवानी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, किल्ला कोर्टाने आज सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून एसटी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.