संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CID चे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CID चे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल

| Updated on: Dec 26, 2024 | 4:21 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या हत्येला अठरा दिवस उलटलेले आहेत. अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद झालेला नाही. दरम्यान विरोधकांनी येत्या शनिवारी बीडच्या कलेक्टर कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे.

बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोडी होत आहे. राज्य CID चे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल झालेले आहेत. या प्रकरणात विरोधाकांनी बीडमध्ये शनिवारी २८ डिसेंबर रोजी कलेक्टर ऑफीसवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अठरा दिवस पूर्ण होत आहेत. बारा दिवसांपूर्वी हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. बीडचे एसपी नवनीत कावत यांच्या सोबत पोलीस अधिक्षक कार्यालयात सीआयडीच्या विशेष पोलीस महासंचालकांची बैठक सुरु आहे. या बैठकीत संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. या हत्ये प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या वाल्मिकी कराड यांच्याकडे संशयाची सुई असल्याने त्यांना या प्रकरणात अटक होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Published on: Dec 26, 2024 01:33 PM