Santosh Deshmukh Murder : आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठे अपडेट आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. एसआयटीने संघटित गुन्हेगारीचा दावा करत कोर्टात मागणी केली होती जी मान्य झाली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने सर्व राज्य ढवळून निघाले आहे. या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड हा अटकेत असून अन्य आरोपीही अटकेत आहे. सुदर्शन घुले,प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आला आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर ही मागणी मान्य करत या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या गुन्ह्यामध्ये मोक्का लावण्यात आला आहे. जवळपास 7 जणाना याप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे. संघटित गुन्हेगारी पाहता एसआयटीकडून वारंवार कोर्टात हे मुद्दे मांडण्यात आले होते. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे, पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडवर मोक्का लावलेला नाही.