उद्या बहुमत चाचणी; आज कोर्टात निकाल
भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार अल्पमतात आल्याचा दावा केल्यानंतर उद्या राज्यसभेत बहुमत चाचणी होणार आहे. या विरोधात शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश शिवसेनेला दिले गेले आहे. आज 5 वाजता त्यावर विशेष सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या […]
भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार अल्पमतात आल्याचा दावा केल्यानंतर उद्या राज्यसभेत बहुमत चाचणी होणार आहे. या विरोधात शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश शिवसेनेला दिले गेले आहे. आज 5 वाजता त्यावर विशेष सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट नंबर 16 मध्ये ही सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला या याचिकेवर सुनावणी करणार आहेत. वकील मनू सिंघवी हे शिवसेनेकडून तर तुषार मेहेता हे राज्यपालांची बाजू मांडणार आहेत. शिवसेनेच्या 39 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
Published on: Jun 29, 2022 02:37 PM
Latest Videos