सोमय्यांच्या हातात पुन्हा हतोडा, कुदळ, फावडा; अनधिकृत स्टुडिओवरून ठाकरेंवर हल्ला
ठाकरे सरकारमध्ये माफियांचं राज्य होतं. अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेने 2021 मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडिओ मलाडमध्ये उभारण्यात आल्याचा घणाघात सोमय्या यांनी केला
मुंबई : मढ-मालाड येथील अनधिकृत स्टुडिओंवर कारवाई करण्याचे आदेश नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल दिल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अस्लम शेख यांच्यावर निशाना साधला आहे. नेशनल ग्रीन ट्रिब्यूनलच्या आदेशानंतर मालाड येथील अनधिकृत स्टुडिओ पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे सोमय्या हे हतोडा, कुदळ, फावडा घेऊन टीका केली आहे.
ठाकरे सरकारमध्ये माफियांचं राज्य होतं. अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेने 2021 मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडिओ मलाडमध्ये उभारण्यात आल्याचा घणाघात सोमय्या यांनी केला. 25 ते 50 हजार स्क्वेअर फुट स्टुडिओंना अनिधीकृत परवानगी आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयाने परवानगी दिली होती. उद्धव ठाकरे याच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेने आओ जावो राज तुम्हारा असा कारभार केला. मातोश्रीला हिशोब द्या आणि जे करायचे ते करा असंच चाललं होतं. पण आता मोदी हे तो मुंनकीन है, आजपासून हे अनधिकृत स्टुडिओ पाडण्यात येणार आहेत.