Video : कांद्याच्या खळ्यात चोरी, मजुरांचे पैसे, मोबाईलची लूट

Video : कांद्याच्या खळ्यात चोरी, मजुरांचे पैसे, मोबाईलची लूट

| Updated on: Jul 24, 2022 | 12:10 PM

पैसे-मोबाईल आणि इतर वस्तू लुटल्या, घटना सीसीटीव्हीत कैद

मालेगाव : भुरट्या चोरांनी कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यात काम करणाऱ्या मजुरांचे कष्टाचे पैसे,मोबाईल आणि इतर वस्तू चोरून नेल्याची संतापजनक घटना देवळा (Deola) तालुक्यातील उमराणे येथे घडली.दोन्ही चोरटे सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेत आहे. उमराणे येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे खळे असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मुक्कामी मजूर काम करतात. कांदा व्यापारी बाळासाहेब देवरे यांचे मुबंई आग्रा महामार्गालगत कांद्याचा खळा आहे. त्यांच्याकडे काही मजूर त्यांच्या कुटुंबियांसह राहतात.या मजुरांना आठवड्याला मजुरी दिली जाते.खळ्यावर काम करणाऱ्या मजुरांना दोन दिवसा पूर्वीच मजुरूची रक्कम मिळाली होती ती त्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवली होती.