राष्ट्रपती निवडणुकीसाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे
राष्ट्रपती निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रपती निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीबद्दल खर्गे यांनी सांगितले की, ज्या वेळी निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यानंतर सोनिया गांधी यांच्या निरोप मिळाल्यानंतर आपण शरद पवारांची भेट घेतली असल्याचे खर्गे यांनी सांगितले. यावेळी समविचारी पक्षांची बैठक घेऊन पुढील निवडणुकीचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपती निवडीसाठी आता काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही आता रंगत येणार असल्याचेच बोलले जात आहे.
Published on: Jun 09, 2022 11:18 PM
Latest Videos