Malshej Ghat Video: माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी, साप्ताहिक सुटीचा बच्चे कंपनी लुटत आहे आनंद

| Updated on: Jul 24, 2022 | 11:22 AM

संततधार पावसामुळे माळशेज घाटात (Malshej Ghat) हिरवळ दाटली आहे. संपूर्ण घाटात धुक्याची चादर पसरली आहे. निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीसह आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. साप्ताहिक सुटी असल्याने आज अनेकांची पावलं माळशेज घाटाकडे वळली. मुंबई आणि पुण्यावरून अनेक जण माळशेज घाटात येत आहे. घाटातील धबधब्यात अनेकांनी आनंद लुटला. पर्यटकांची गर्दी तासागणिक वाढत आहे, यानिमित्यांने […]

संततधार पावसामुळे माळशेज घाटात (Malshej Ghat) हिरवळ दाटली आहे. संपूर्ण घाटात धुक्याची चादर पसरली आहे. निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीसह आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. साप्ताहिक सुटी असल्याने आज अनेकांची पावलं माळशेज घाटाकडे वळली. मुंबई आणि पुण्यावरून अनेक जण माळशेज घाटात येत आहे. घाटातील धबधब्यात अनेकांनी आनंद लुटला. पर्यटकांची गर्दी तासागणिक वाढत आहे, यानिमित्यांने स्थानिक लोकांनी चहा कॉफी आणि नाश्त्याचे स्टॉल लावले आहे. पर्यटकांमुळे स्थानिक लोकांनाही रोजगार मिळत आहे. खाजगी वाहनाच्या लांबच लांब रंगा माळशेज घाटात पाहायला मिळत आहे. पावसामुळे रस्ते आणि परिसर निसरडा झाल्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Published on: Jul 24, 2022 11:22 AM