माहीम झालं, सांगली झालं, आता पुण्यापाठोपाठ मुंब्रा मनसेच्या रडारवर
माहीम दर्ग्यानंतर सांगलीत कारवाई करण्यात आल्यानंतर पुण्यात देखील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या सभेचा फिव्हर आणि त्याचा परिणाम आता चांगलाच दिसत आहे. राज ठाकरे यांच्या या सभेनंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. माहीम दर्ग्यानंतर सांगलीत कारवाई करण्यात आल्यानंतर पुण्यात देखील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली. त्यानंतर तेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान आता मुंब्रा परिसरातील मशीच मनसेच्या टार्गेटवर आली असून त्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. जर कारवाई नाही झाली तर शेजारी मंदिर उभारून असा इशारा मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.
Published on: Mar 24, 2023 10:18 AM
Latest Videos