शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ​माझी घुसमट होत होती !

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ​”माझी घुसमट होत होती !”

| Updated on: Jun 19, 2023 | 8:48 AM

विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मनिषा कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करताच आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मनिषा कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करताच आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आहे. “अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात आहेत. परंतु मला या सत्तांतराच्या काळानंतर कधीही संधी देण्यात आली नाही. अनेक ठिकाणी माझे प्रश्न आहेत ते डावलले जायचे. अनेक काम मला करायचं होतं. त्यासाठी मी संधी मागत होते. परंतू ती संधी मला उद्धव ठाकरे यांनी दिली नाही. शिवसेना पक्षात अनेक पक्षप्रवेश होत आहेत. ते पाहून तसंच राज्याचा देखील विकास होत आहे, तो मी पाहत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा विकास होत असताना मला देखील विकासामध्ये यायचं होतं. म्हणून त्यासाठी मी आज निर्णय घेतला आणि या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला आहे”, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

Published on: Jun 19, 2023 08:48 AM