Manish Sisodia: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
दिल्लीचे माजी उत्पादन शुल्क आयुक्त ए गोपीकृष्ण यांच्या दमण आणि दीवमधील जागेचाही शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्ली सरकारने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे हे लोक त्रस्त आहेत आणि..
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI Raid) आज सकाळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या दिल्लीतील निवासस्थानासह देशभरातील एकूण 21 ठिकाणांची छापेमारी केली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तपास यंत्रणा मनीष सिसोदिया यांच्या घराची झडती घेत आहे. दिल्लीचे माजी उत्पादन शुल्क आयुक्त ए गोपीकृष्ण यांच्या दमण आणि दीवमधील जागेचाही शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्ली सरकारने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे हे लोक त्रस्त आहेत आणि त्यामुळेच दोन्ही विभागांच्या मंत्र्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे. न्यायालयात सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले.
Published on: Aug 19, 2022 10:12 AM
Latest Videos