‘घाम गाळण्यासाठी बाहेर आलोय आराम…,’ 17 महिन्यांनी जामिनावर सुटल्यावर काय म्हणाले सिसोदिया

अरविंद केजरीवाल यांचे उजवा हात मानले जाणारे मनिष सिसोदिया यांना सतरा महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांनी भाषण करीत आपल्याला संविधानामुळे हा जामिन मिळाला असून सर्वोच्च न्यायालय आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांचे देखील सिसोदिया यांनी आभार मानले आहेत.

'घाम गाळण्यासाठी बाहेर आलोय आराम...,' 17 महिन्यांनी जामिनावर सुटल्यावर काय म्हणाले सिसोदिया
| Updated on: Aug 10, 2024 | 4:58 PM

सध्या तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या मनिष सिसोदिया यांना 17 महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. यावेळी मनिष सिसोदिया यांनी जोरदार भाषण केले आहे. ते म्हणाले की देशातील कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कोणत्याही माणसाला विचारले तर अरविंद केजरीवाल कोण आहेत तर ते म्हणतील अच्छा काम करता था. भाजपाने त्यांचे देशातील एक तरी राज्य दाखवावे जेथे केजरीवाल यांच्यासारखे काम केले आहे असा सवाल मनिष सिसोदिया यांनी यावेळी केला आहे. मी हनुमानजी आणि देशाच्या संविधानामुळे बाहेर आलो आहे. आमच्या विरोधात साम दाम दंड भेद वापरुनही आम्ही तुटलो नाही कि भाजपात गेलो नाही. बाबासाहेबांनी 75 वर्षांपूर्वीच घटनेत अशी तरतूद करुन ठेवली आहे की यदाकदा जर कोणी हुकुमशहा सत्तेवर आला आणि त्याने खोटेनाटे आरोप लावून आपल्या विरोधकांना व्यापाऱ्यांना संपावायचा प्रयत्न केला तर त्यांच्या मदतीला संविधान धावून येईल. त्यामुळे या तरतूदी मुळेच सतरा महिन्यांना का होईना मी बाहेर आल्याचे मनिष सिसोदिया यांनी सांगितले. तुरुंगात फरशीवर झोपणे मला काही नवे नाही. कारण मी, संजय आणि अरविंद केजरीवाल जेव्हा हॉटेलात निवास करण्याचे पैसे नसायचे तेव्हा बनारस स्थानकातच पुढची ट्रेन पकडण्यासाठी वर्तमान पत्र अंथरुण झोपलेलो आहोत त्यामुळे आम्हाला हे काही नवीन नसल्याचेही त्यांनी म्हटले.

 

Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.