जाता जाता मनिषा कायंदेंचा उद्धव ठाकरेंना ‘हा’ सल्ला; म्हणाल्या, “दोषारोप करण्यापेक्षा…”
विधान परिषदेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई: विधान परिषदेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्ष प्रमुखांशी बोलताना अडचण यायची. खरा फिडबॅक दिला जात नव्हता. पक्ष प्रमुखांशी कुणी बोलू शकत नसेल. कुणी कार्यकर्त्यांकडून पैसे उकळले जातात. बाळासाहेबांची शिवसेना इथ आहे म्हणून मी येथे आहे. कचरा निघून जातो. कचऱ्यातून वीजनिर्मिती होते. ही कशी निर्मिती होते ते तुम्ही बघा.ज्यावेळी महाविका आघाडी झाली तेव्हा जुन्या जाणत्या लोकांना ते आवडलं नाही. पण पक्षप्रमुख बोलल्यामुळे सरकार स्थापन झाले. सरकार आल्यावर तसे काम झाले नाही. अनेक अडचणी निर्माण झाल्या. जे बोलायचे होते ते बोलू शकले नाहीत. कोणी महिला कार्यकर्त्याकडून पैसे उकळते आहे. हे जर असेल तर ती बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे त्यामुळे इथे आली आहे. एक वर्षात उद्धव ठाकरेंनी पक्षपुनर्बांधणी करताना केवळ दोषारोप केले. आत्मपरिक्षण न करणं की लोक पक्ष सोडून का चाललेत, यापुढे सुद्धा लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.