Manisha Kayande : संजय राठोडांना मंत्री केल्यानं चित्रा वाघ अस्वस्थ, आमदार कायंदे यांची प्रतिक्रिया
शिवसेना नेत्या, आमदार मनिषा कायंदे यांनी देखील संजय राठोड यांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी वाघ यांना आव्हान दिलंय.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी शिंदे गटाचे 9 तर भाजपचे 9 असे एकूण 18 मंत्र्यांना गोपनियतेची शपथ दिली. ज्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून रंगली होती. तो राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) पार पडला. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आमदार संजय राठोड यांना मंत्री केल्यानं भाजप नेत्या चित्रा वाघ या प्रचंड संतापल्याचं दिसत आहे. यावरही महिला नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेत्या आणि आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी देखील संजय राठोड यांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘महिलांच्या सन्मानासाठी आपण राहुल शेवाळे, संजय राठोड, श्रीकांत देशमुख यांचं वस्त्रहरण करण्यासाठी एकत्रित लढा उभारूया, असं आव्हान कायंदे यांनी चित्रा वाघ यांनी दिलं आहे.