Video : एमआरआय कक्षात फोटोग्राफी करणं चुकीचंच- मनिषा कायंदे
लिलावती रुग्णालय (lilavati hospital) आम्हाला आमचं वाटतं. खासदार नवनीत राणा (navneet rana) इकडे उपचारासाठी आल्या होत्या. इथे आल्यावर एमआरआय करतानाचे त्यांचे व्हिडिओ, फोटो दिसले. त्यांचा आजार काय होता आणि काय नाही या गोष्टी न्याय प्रविष्ट आहे. त्यावर आम्ही बोलणार नाही. हे एक चांगलं हॉस्पिटल आहे. यात सामान्य नागरिक आणि व्हिआयपी येतात. नियम कडक असतात. विनाकारण फोटोग्राफी […]
लिलावती रुग्णालय (lilavati hospital) आम्हाला आमचं वाटतं. खासदार नवनीत राणा (navneet rana) इकडे उपचारासाठी आल्या होत्या. इथे आल्यावर एमआरआय करतानाचे त्यांचे व्हिडिओ, फोटो दिसले. त्यांचा आजार काय होता आणि काय नाही या गोष्टी न्याय प्रविष्ट आहे. त्यावर आम्ही बोलणार नाही. हे एक चांगलं हॉस्पिटल आहे. यात सामान्य नागरिक आणि व्हिआयपी येतात. नियम कडक असतात. विनाकारण फोटोग्राफी करण्यास कुणालाही परवानगी नाही. एमआरआयमध्ये तुम्हाला मेटल घेऊन जाता येत नाही. पेशंटच्या मुव्हमेंटची खबरदारी घेतली जाते. असं असताना एमआरआय कक्षात जाऊन व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी होणं चुकीचं आहे. त्याविरोधात आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी दिली. मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयात मीडियाशी संवाद साधला.
Latest Videos