मी पक्ष नाही, नेतृत्व बदललं, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशानंतर मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया

“मी पक्ष नाही, नेतृत्व बदललं”, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशानंतर मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 19, 2023 | 2:54 PM

आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिंदे गटात प्रवेश केला आहे.शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी मीडियाशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पक्ष सोडल्याची खदखद बोलून दाखवली आहे.

मुंबई : आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिंदे गटात प्रवेश केला आहे.शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी मीडियाशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पक्ष सोडल्याची खदखद बोलून दाखवली आहे. त्या म्हणाल्या की, “मी उद्धव ठाकरेंसोबत काम करत होते. त्यांनी मला विधान परिषद दिली. मान सन्मान दिला. मी 2012मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेबांची शिवसेना होती. मी आताही शिवसेनेत आहे. नेतृत्वात बदल झाला आहे. अधिकृत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. मी पक्ष बदल केला नाही. माझा राजकीय प्रवास मोठा आहे. मी भाजपमध्ये 25 वर्ष काम केलं. मी मतदार म्हणून सर्वात आधी शिवसेनेला मतदान केलं आहे. माझं मतदान नेहमीच शिवसेनेला राहिलं आहे. मी सतत शिवसेनेचं काम केलं. भाजप आणि शिवसेनेची विचारधारा समानच होती. त्यामुळे भाजपमधून शिवसेनेत आल्यावर माझी विचारधारा तीच राहिली. माझ्या शिवसेना प्रवेशाने कुणाच्या भुवया उंचावल्या नाही.”

Published on: Jun 19, 2023 02:54 PM