राऊत यांच्यावर कोणाचा पलटवार; म्हणाल्या, ‘लोक टीका करतात, पण कचऱ्यातूनच…’
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया देताना, कोण जाणार त्यांचं नाव माहीत नाही. हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका उलटला तर परत आमच्या दारात येतो. ते फार महान लोक नाहीत. सोडून द्या त्यांना, असं राऊत म्हणाले.
मुंबई : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. याच्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया देताना, कोण जाणार त्यांचं नाव माहीत नाही. हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका उलटला तर परत आमच्या दारात येतो. ते फार महान लोक नाहीत. सोडून द्या त्यांना, असं राऊत म्हणाले. त्यावरून कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी, अनेक लोक टीका करत आहेत. या ठिकाणी कचरा म्हणून उल्लेख करतात. परंतु माझी मी सांगू इच्छिते की, या कचऱ्यातूनच मोठी ऊर्जा ही निर्माण होते. तसेच सकाळी उठून काहीतरी बोलणाऱ्यांपेक्षा काम करायचे आहे. कचऱ्यातूनच ऊर्जा निर्मिती करण्यात येते असे प्रत्युत्तर मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंनाही दिलं आहे. तर नक्कीच महिलांचे अनेक प्रश्न आहेत. ते मी या ठिकाणी मार्गे लावणार आहे. महिलांसाठी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ते मी घेण्यासाठी तयार आहे.