maharashtra politics : शिवसेनेतून हाकालपट्टीनंतर मनिषा कायंदे यांच्यावर शिवसैनिक नाराज; बॅनरमधून फोटोच कापला?
कायंदे यांनी ठिक वर्धापनाच्या एक दिवस आधाच शिंदे गटात प्रवेश करत थेट उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कायंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केली.
मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता जवळपास एक वर्ष होत आहे. या कालावधीत ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदेही शिंदे गटाच्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना याचा धक्का बसला आहे. तर कायंदे यांनी ठिक वर्धापनाच्या एक दिवस आधाच शिंदे गटात प्रवेश करत थेट उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कायंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केली.
यानंतर आता नवा वाद होण्याची शक्यता असून ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून मनीषा कायंदे यांचा फोटो कापण्यात आला आहे. शन्मुखानंद येथे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. येथे याचसाठी सन्मानंद कॉलेजच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेले आहे. यातीलच एका बॅनरवरून मनीषा कायंदे यांचा फोटो कापण्यात आला आहे. कायंदे यांनी कालच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाचा प्रवेश घेतला. त्यानंतर रात्री उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी यांच्याकडून या बॅनरवरील मनीषा कायंदे यांचा फोटो कापण्यात आलेला आहे.