'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे यांनी काय केले आवाहन

‘मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला…,’अश्रू गाळीत मनोज जरांगे यांनी काय केले आवाहन

| Updated on: Jul 06, 2024 | 6:00 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा दौरा सुरु केला आहे. हिंगोलीतून शनिवारी या दौऱ्याची सुरुवात झाली आहे. या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे यांचे अश्रु अनावर झाले.त्यांनी मराठ्यांना आवाहन केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठावाडा शांतता दौरा सुरु केला आहे. आंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळावरील ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन जरांगे पाटील यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. हा दौरा 13 जुलैपर्यंत चालणार आहे. या दौऱ्याची सुरुवात शनिवारी हिंगोलीवरुन करण्यात आली आहे. या दौऱ्यात लाखो मराठा बांधवाची गर्दी केली आहे. जागोजागी त्यांचे मोठे स्वागत केले जात आहे. मात्र,  या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की मराठ्यांची लेकरं शिकून पुढे येऊ नयेत म्हणून षडयंत्र रचले जात आहे. मला रोखायचा प्रयत्न केला जात आहे. सरकारला माहीती आहे मराठ्यांना पुन्हा असा नेता मिळणार नाही. म्हणून  माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मला उघडं पाडण्याचा प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सरकारने काही केले तरी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्या पाठीशी राहा असेही आवाहन करताना जरांगे पाटील यांचे अश्रू अनावर झाले. जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. 6 जुलै – हिंगोली, 7 जुलै -परभणी, 8 जुलै -नांदेड, 9 जुलै -लातूर, 10 जुलै -धाराशिव, 11 जुलै – बीड,12 जुलै – जालना, 13 जुलै – संभाजीनगर अशी ही रॅली असणार आहे

Published on: Jul 06, 2024 05:55 PM