Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नंबरच्या आरोपीने खंडणीसाठी खुन करायला लावण्याचे सिद्ध झाले आहे. संतोष देशमुख यांचा खून केला हे सत्य आहे. पण हा खून धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच झाला असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मात्र सरकारने धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील यावेळी जरांगे यांनी केला आहे. ही सगळी चर्चा लोकांमध्ये होत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनीच मोर्चे काढायला लावले. रस्ता रोको आंदोलन करायला लावले. तसेच माझा संबंध नसताना माझ्या फोटोला धनंजय मुंडे यांनीच जोडे मारायला लावले. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी नियतीला ते मान्य नसतं. तुम्हाला याचे फळ मिळेल. सरकारने धनंजय मुंडे यांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ते आता शक्य होणार नाही. एक ना एक दिवस बदलणार आणि संतोष भैया देशमुख यांचा खून खटल्याचा योग्य तपास होईल, असा विश्वास यावेळी जरांगे यांनी व्यक्त केला. लोकांमध्ये याबद्दल चर्चा सुरू असून यावर तपास व्हायला हवा असंही जरांगे म्हणाले.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न

'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप

'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज

सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
