गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याया मिळावा म्हणून आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत सुरेश धस, मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याया मिळावा म्हणून आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत सुरेश धस, मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भरससभेत मनोज जरांगे यांनी मुंडेंच्या कार्यकर्त्यांची कृत्यं, कारनामे उघड करत त्यांच्यावर हल्ला चढवला. कृष्णा कोरे याच्या मृत्यूबद्दल बोलताना जरांगे यांनी एक फोटो दाखव सरकारवर टीका केली.
या फोटोतील बॉडी पूर्ण सडली किडे पडले. तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्याने पैदास केलेल्या गुंडांनी हे केलं. याचा खून झाला आणि आरोपी अटकेत नाही. गृहमंत्री आहेत की झोपले, असा सवाल विचारत मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला.
संतोष देशमुख प्रकरणातील खून प्रकरणातील आरोपींवर मकोका लागला आहे. पण जर खंडणीतील आरोपीला मकोका लागला नाही तर आम्हाला हा मकोका मान्य नाही. खंडणीतील आरोपीवर मकोका लागला पाहिजे. खंडणीमुळेच हा गुन्हा घडला आहे. त्यामुळे खंडणीतील आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यात आले पाहिजे,अशी मागणीही जरांगे यांनी केली.