Manoj Jarange Patil यांचं कुटुंब Tv9 मराठीवर, आंदोलक म्हणून मराठा समाजासाठी लढा देणं, जरांगे कुटुंबाला काय वाटतं?
VIDEO | जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांना मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काय वाटतं?
जालना, ४ सप्टेंबर २०२३ | जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी मराठा आंदोलकांवर भीषण लाठीचार्जची घटना घडली. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद बघायला मिळाले. दरम्यान, ज्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील होते. त्यास्थळी गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळाती बड्या नेत्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी त्यांनी आंदोलकाची नेमकी मागणी काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी “मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलं आहे. तर काल देवेंद्र फडणवी यांनी फोनवरून चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला भेटण्याचे निमंत्रण दिले असून तुमच्या मागणीवर चर्चा करण्यासही सांगितले आहे. तर यासोबतच या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.’. यासगळ्यात टीव्ही ९ मराठीवर मनोज जरांगे पाटील यांचं कुटुंब आलं असून त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काय वाटतं बघा व्हिडीओ