Video | ‘सरकार काही माझं शत्रू नाही, मी माझ्या…,’ काय म्हणाले मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे. सरकार माझे शत्रू नाही. सरकारने दिलेली आश्वासन पाळायला हवीत. त्यांनी आमच्या मुलांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर | 27 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सनसनाटी टीका केल्यानंतर काल आपले उपोषण आंदोलन मागे घेतले. मनोज जरांगे यांनी आता साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोप आजही कायम असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी गावात संचारबंदी लावली आणि आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मी सरकारच्या विरोधात नाही. सरकार काही माझं शत्रू नाही. माझ्या बांधवाना न्याय मिळे पर्यंत ही लढाई सुरुच रहाणार आहे. परंतू सगेसोयरे अध्यादेश तुम्ही काढला ना ? मग त्याची अंमलबजावणी करणे सरकारचे काम आहे. आम्ही मागितले नसतानाही बळेबळेच 10 टक्के आरक्षण दिले आहे. आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे आपले आंदोलन लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बरोबरच त्याच वेळी बंदूक दाखवत असलेला फोटो समाजमाध्यमावर का ठेवला ? एवढा खूनशीपणा आहे तुम्हाला मराठ्यांविषयी असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे. आमचा आंदोलन करण्याचा हक्क कोर्टाने देखील मान्य केला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवूनच देणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.