मुंबईतील मराठा समाज बांधवांची या तारखेला बैठक, मनोज जरांगे पाटील यांनी दिली माहिती
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली ओबीसी प्रवर्गातून सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी आहे. मराठा समाजाचा डाटा मिळविण्यास वेळ लागेल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यावर आम्हाला तसले आरक्षण नको आहे. ते पन्नास टक्क्यांच्या वर जाऊन कोर्टात टिकणार नाही. आम्हाला कुणबी प्रमाणपत्रावर सरसकट ओबीसीतून आरक्षण हवे आहे आणि आम्ही ते घेणारच असे त्यांनी म्हटले आहे.
जालना | 31 डिसेंबर 2023 : मराठा समाजाचा डाटा गोळा करायला वर्षभराचा तरी वेळ लागू शकतो असे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावर आमची मागणी ओबीसी प्रवर्गातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची मागणी असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. पोरांनी थर्टी फर्स्टला आपल्या घरात जे असेल ते खावे आणि आई-वडीलांना वेळ द्यावा, अभ्यास करावा, शेतात काम करावे. आपले पैसे दारू का काय पितात त्यावर उडवू नये. मला थर्टी फर्स्ट काय आहे ते माहीती नाही. येत्या 3 जानेवारीला मुंबईतील मराठा बांधवाची मुंबईतील आंदोलनासंदर्भात बैठक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला आपआपसातील सर्व मतभेद विसरून या बैठकीला यावे असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला

संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास

एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
