Manoj Jarange Patil यांचा निर्धार कायम; म्हणाले, ‘आमरण उपोषण सोडायला तयार पण…’

| Updated on: Sep 13, 2023 | 11:21 AM

VIDEO | मराठा आरक्षण मिळवून देणार, निर्धार कायम... मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेलं आमरण उपोषण सोडणार पण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

जालना, १३ सप्टेंबर २०२३ | दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अधिकच तीव्र होताना दिसतंय. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं असून मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असले म्हटले आहे. तर आमरण उपोषण सोडायला तयार पण आंदोलनाची जागा सोडणार नाही, असे स्पष्टच मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जरांगे यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला आहे. पुढच्या महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय द्यावा, असा इशारच जरांगे यांनी दिला आहे. तर हे उपोषण सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि मंत्रिमंडळातील नेत्यांनी उपस्थित रहावं, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

Published on: Sep 13, 2023 11:11 AM
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचा मुहूर्त ठरणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत कोणता मुद्दा केंद्रस्थानी?
Balasaheb Thorat स्पष्टच म्हणाले, ‘खूप टाईमपास झाला, आता लवकर…’