नाव घेऊन पाडणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा
लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केलीय.
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतील आहे. 4 जून रोजी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आता थेट आमरण उपोषणाला सुरुवाात केली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे पाटील यांनी आता थेट आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसह सरकारी यंत्रणेच्या पोटात गोळा आला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आता थेट मोदींनाच साकडे घालण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
जरांगे पाटील यांचा इशारा काय?
मराठा आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांवर उमेदवार देणार. तसेच आता थेट नाव घेऊन पाडेन, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला दिला आहे.
Published on: Jun 08, 2024 11:52 AM
Latest Videos