बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीला परवानगी मात्र सभेला नकार, कसा असणार मार्ग?

| Updated on: Jul 11, 2024 | 10:44 AM

जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला पोलिसांकडून तीन किलोमीटरपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे मात्र सभेला परवानगी दिली नाही. या परवानगीवरूनच सोशल मीडियावरून आफवा पसरवू नका, असं आवाहन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय. बीडच्या शातंता रॅलीसाठी मोठी तयारी....

Follow us on

लातूर, धाराशिवनंतर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली बीडमधून निघणार आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र त्याआधीच परवानगीवरून वादही रंगतोय. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजातील आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली आणि सरकारवर टीका केली. जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला पोलिसांकडून तीन किलोमीटरपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे मात्र सभेला परवानगी दिली नाही. या परवानगीवरूनच सोशल मीडियावरून आफवा पसरवू नका, असं आवाहन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय. बीडच्या शातंता रॅलीसाठी मोठी तयारी सुरू असून बीड हा जिल्हाच मराठ्यांच्या आंदोलनासाठी केंद्र राहिलं आहे. काही महिन्यांपूर्वी हिसंक पडसाद उमटले होते. त्यामुळे आताच्या रॅलीला कोणतंही गालबोट लागू नये, म्हणून पोलीस विभागही सज्ज झालाय. बघा कसा असणार रॅलीचा मार्ग?