Video: मनसुख हिरेन यांच्या तोंडावर एवढे रुमाल कसे? घातपाताचा संशय वाढणारा तो व्हिडीओ प्रत्यक्ष बघाच!

| Updated on: Mar 05, 2021 | 10:06 PM

मनसुख हिरेन यांच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचे रुमाल आढळल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. Mansukh Hiren death case scarf found

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani bomb scare) यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ (Scorpio) सापडली होती.  मनसुख हिरेन या स्कॉर्पिओच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्यातल्या खाडीत सापडला आहे.  मनसुख हिरेन यांच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचे रुमाल आढळल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातील खाडीत सापडला, यावेळी त्यांच्या तोंडावर रुमाल आढळल्यानं ही आत्महत्या आहे की घातपात याविषयी संशय बळावला आहे. (Mansukh Hiren death case scarf found on mouth of death body of Hiren raised mystery)

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे

मनसुख हिरेन यांची मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी सर्व प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला.

मनसुख हिरेन यांच्या तोंडावर एवढे रुमाल कसे?

(Mansukh Hiren death case scarf found on mouth of death body of Hiren raised mystery)

Published on: Mar 05, 2021 10:06 PM