Paris Olympics 2024 : महिला नेमबाज मनु भाकरचा इतिहास, ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं पदक
भारताच्या मनू भाकरला 10 मीटर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक मिळालं आहे. मनु ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे. मनुने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदक मिळवलं. मनुला रौप्य पदकाची संधी होती, मात्र ती...
देशवासियांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं खातं उघडलं असून भारताच्या महिला नेमबाज मनू भाकर हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. भारताच्या मनू भाकरला 10 मीटर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक मिळालं आहे. मनु ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे. मनुने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदक मिळवलं. मनुला रौप्य पदकाची संधी होती, मात्र ती थोडक्यात हुकल्याने तिच्या पदरात कांस्य पदक पडलं आहे. दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिकमधून मनु भाकर हिने 2020 मध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तेव्हा मनु भाकरची यशस्वी कामगिरी न झाल्याने ती अपयशी ठरली होती. मनुला तेव्हा 12 व्या स्थानी समाधान मानावं लागल्याने तिचं आव्हान संपुष्टात आलं. मात्र आता तिने जोरदार कमबॅक करत आता भारतासाठी पहिलं वहिलं पदक पटकावलंय.