भविष्यात धक्के बसणार; कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार, बावनकुळेंचा 'मविआ'ला सूचक इशारा

भविष्यात धक्के बसणार; कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार, बावनकुळेंचा ‘मविआ’ला सूचक इशारा

| Updated on: Sep 29, 2022 | 2:37 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या 'मविआ'मधील घटक पक्षांवर जोरदार निशाणा साधाला आहे.

नागपूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस आणि शिवसेना (Shiv sena) या ‘मविआ’मधील घटक पक्षांवर जोरदार निशाणा साधाला आहे. मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नव्हते, त्यामुळे 18 महिने एकट्या राष्ट्रवादीने सरकार लुटल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मविआमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना आहे, कार्यकर्ते पक्षांवर नाराज आहेत, त्यामुळे अनेक जण भाजपमध्ये येत आहेत. भविष्यात धक्के बसतील,  बॉम्बस्फोटही होतील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना बवनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील जोरदार टोला लगावला आहे.  उद्धव ठाकरे यांच्याकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांच्या या टीकेला आता विरोधक काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Sep 29, 2022 02:37 PM