हौशी पर्यटकाकडून नियम धाब्यावर; धरणात पोहण्यासाठी बंदी असताना बिनधास्त उड्या, कुठं घडतयं नेमकं असं?
सतत पडणाऱ्या पावसामुळे लोणावळ्यातील प्रसिद्ध धरण देखील आता भरले आहे. तर ते ओव्हप फ्लो झाल्याने लोणावळ्यात विकेंडला आनंद लूटायला पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र काही हौशी पर्यटक आपल्या जीवाशी खेळताना दिसत आहेत.
लोणावळा, 30 जुलै, 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस पडतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण देखील आता भरले आहे. तर ते ओव्हप फ्लो झाल्याने लोणावळ्यात विकेंडला आनंद लूटायला पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र काही हौशी पर्यटक आपल्या जीवाशी खेळताना दिसत आहेत. भुशी धरणात पोहण्यासाठी बंदी असताना अनेक पर्यटक बिनधास्तपणे उड्या मारत आहेत. ह्या ठिकाणी लोणावळा पोलिसांनी पोहण्यासाठी बंदी केली असली तरी देखील अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालत आहे.
Published on: Jul 30, 2023 11:09 AM
Latest Videos