...तर तुमचा राजकीय सुपडा साफ होऊन जाईल, मनोज जरांगे यांनी दिले आव्हान

…तर तुमचा राजकीय सुपडा साफ होऊन जाईल, मनोज जरांगे यांनी दिले आव्हान

| Updated on: Jan 23, 2024 | 8:18 PM

मराठा समाजाचे भगवे वादळ येत्या काही दिवसात मुंबईत पोहचणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सध्या पुण्यात पोहचले असून 32 किमीपर्यंत वाहनांची रांग लागली आहे. या मोर्च्यात महीला आणि लहान मुले देखील आहेत. मराठ्यांनी सात महिने सरकारला दिले होते. आणखी किती वेळ सरकारला पाहीजे असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

पुणे | 23 जानेवारी 2024 : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 20 जानेवारीपासून अंतरवाली सराटीतून निघालेला मराठा समाजाचा मोर्चा पुण्यात पोहचला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने गोडीगुलाबीने मार्ग काढावा. आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू नये. आपण मरणाला घाबरत नाही. सरकार काय गोळीबार करणार का? जर मला काही झाले तर सरकारचा कायमचा राजकीय सुपडा साफ होऊन जाईल असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे. आपण सरकार सात महिने दिले होते. आता दीड महिने आम्ही सरकारला 54 लाख नोंदीवर सरकार निर्णय कधी घेणार हे विचारत आहे. सरकारने हे लक्षात घ्यावे आणि मराठा समाजाने सर्व राजकीय पक्षांना दूर केले आहे. मराठा आता फक्त त्याच्या लेकराचाच आहे. आम्ही मुंबईत येणार आणि ओबीसीतून आरक्षण घेणार असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Published on: Jan 23, 2024 08:16 PM