पंकजा मुंडे यांचा निर्धार? दवे यांच्या टीकेवर मराठा नेत्यांचा इशारा म्हणाला, ‘दवे लायकीत राहा…’
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत आपण फेटा बांधणार नाही असं म्हटलं आहे. त्यावरून आता राजकीय टीका टीपण्णी होताना पहायला मिळत आहे. यावरून हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी टीका केली.
पुणे/ कोल्हापूर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करताना बीड येथे मोठा निर्धार केला. त्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत आपण फेटा बांधणार नाही असं म्हटलं आहे. त्यावरून आता राजकीय टीका टीपण्णी होताना पहायला मिळत आहे. यावरून हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी टीका केली. त्यांनी टिकणारं मराठा आरक्षण हे अवघड आहे. तर सर्वच राजकीय पक्ष सत्तेवर येऊन सुद्धा मराठा आरक्षण ते का देऊ शकले नाहीत असा हिंदू महासंघाचा प्रश्न असल्याच म्हटलं आहे. तर पंकजा मुंडे यांनी घेतलेली शपथ ही आता त्यांना फेटा न बांधणारीच ठरेल का अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावर मराठा नेते दिलीप पाटील यांनी पलटवार करताना, पंकजा मुंडे यांच्या बदललेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. तर पुण्यातील व्हायरस दवे नावाच्या व्यक्तीने मराठा समाजाला कायद्याने टिकाऊ आरक्षण मिळत नाही, मिळू शकत नाही असं म्हटलं आहे. त्या दवेला सांगू इच्छितो मराठा समाजाच्या नादाला लागल तर पुणे काय महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल. तर दवे लायकीत राहा, लायकी सोडू नको, दवेला महाराष्ट्रात फिरु देणार नाही असा इशारा देत असल्याचं पाटील म्हणालेत.