गुलाल उधळायचा नको.. असे मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते, काय म्हणाले जरांगे

गुलाल उधळायचा नको.. असे मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते, काय म्हणाले जरांगे

| Updated on: Oct 16, 2024 | 5:16 PM

महाराष्ट्रात कालच निवडणूकांची घोषणा झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय न घेतल्याबद्दल मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. आपल्या महायुतीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारपेक्षा हीन वागणूक दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लागू होणार नाही असे मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. मात्र, आचारसंहिता लागू झाली तरी मराठ्यांना आरक्षण लागू झालेले नसल्याने मनोज जरांगे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आम्ही मराठ्यांसाठी अनेक निर्णय घेतले. सारथी योजना आणली, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना उद्योजक बनवले,पाच हजार अधिसंख्य पद आमच्या सरकारने कायम केली, आज ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळत आहेत इतके सगळं कुणी केले. ज्यांनी काहीच केले नाही, मराठा समजाचा केवळ वापर केला.त्यांच्या बद्दल त्यांनी विचार केला पाहीजे देणारा कोण ? फसवणारा कोण ? असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ते भंगार होते म्हणून तर तुम्हाला आणून बसवले ना. पण तुम्ही तर महाविकास आघाडी पेक्षा आम्हाला हीन वागणूक दिली. मी गुलाल उधळायचा नको असे शिंदे साहेबांना वाशीच सांगितले होते, आणि उधळायचा तर त्याचा अपमान व्हायला नको असेही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

 

Published on: Oct 16, 2024 05:11 PM