सावंत साहेब काल पोळलंय... या पुढे लक्षात ठेवा,  माफीनंतरही मराठा समाज आक्रमक

सावंत साहेब काल पोळलंय… या पुढे लक्षात ठेवा,  माफीनंतरही मराठा समाज आक्रमक

| Updated on: Sep 26, 2022 | 2:55 PM

मराठा आरक्षणात ओबीसी आरक्षणातून जी भूमिका घेतली आहे, त्याविरोधात तुम्ही बोललात तर काल जसं पोळलंय, तसं यापुढेही पोळत राहणार, असा इशारा योगेश केदार यांनी दिला आहे.

पुणेः आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या वक्तव्यावरून मराठा समाजाची माफी मागितल्यानंतरही मराठा समाजातून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. मराठा समाजाचे समन्वयक योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी सावंत यांना इशाराच दिला आहे. मराठा समाजानं आज ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) मागितलंय, उद्या एससीतून मागतील, अशा पद्धतीनं मुक्ताफळं उधळली, ही समाजाला आवडेली नाहीत. तुम्ही त्याच भाषणात म्हणालात, काही पिले विरोधकांनी सोडली आहेत. तुम्ही मराठा समाजाच्या उत्स्फूर्त भावनेची खिल्ली उडवत आहात का, असा सवाल योगेश केदार यांनी केलाय. सावंत सर आम्ही तुमचे प्रेमी आहोत. पण मराठा आरक्षणात ओबीसी आरक्षणातून जी भूमिका घेतली आहे, त्याविरोधात तुम्ही बोललात तर काल जसं पोळलंय, तसं यापुढेही पोळत राहणार, असा इशारा योगेश केदार यांनी दिला आहे.

 

Published on: Sep 26, 2022 02:55 PM